रायगड बहुजननामा : आपल्या कट्टर समर्थकाने केलेल्या शिवसेना प्रवेशामुळे सुनील तटकरे यांना चांगलाच हादरा बसला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी त्यांच्या परिवारा सोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात तटकरे याना मोठा धक्का बसल्याचे म्हंटले जात आहे. महाडचे शिवसेना आमदार भारत गोगावले यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सुनील तटकरे यांच्या खास असणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक रघुवीर देशमुख यांनी शिवधनुष्य हाती घेतल्यामुळे गोगावले यांचे पारडे जड होणार असल्याचं म्हंटले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत तटकरे यांना चांगलाच फटका बसला आहे. रघुवीर देशमुख यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी माधवी देशमुख, राज देशमुख , रोहन देशमुख यांनी देखील शिवसेना प्रवेश केला आहे. आमदार भरत गोगावले त्यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने नक्कीच तालुक्याला त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा होणार आहे . तसेच त्यांना शिवसेना संघटनेत सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे भरत गोगावले यांनी म्हंटले आहे.
रघुवीर यांनी प्रवेशावेळी म्हंटले कि , विकासकामांना चालना देण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तरी तटकरे कुटुंबियांविषयी मला आदर आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे याच्या विजयात रघुवीर देशमुख यांचा मोठा वाटा आहे, देखमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तसेच तटकरे संघटनेला आव्हानाला सामोरे जावे लागणार असल्याचे म्हंटले जात आहे.