Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar | ‘शिस्तीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपातून 80 टक्के लोक आमच्याकडे…’, शरद पवारांच्या विधानावर भाजप मंत्र्यांचा पलटवार; म्हणाले – ‘ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत…’

मुंबई: Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जोरदार तयारी सुरु केली आहे. परिवर्तन महाशक्ती (Parivartan Mahashakti) तिसरी आघाडी म्हणून यंदाच्या विधानसभेत किती प्रभाव पाडणार याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेने (MNS) यावेळी स्वबळाचा नारा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने आघाडी (Vanchit Bahujan Aghadi-VBA) घेत उमेदवारांच्या दोन याद्या घोषित केल्या आहेत. तसेच नाराज असलेले नेते बंडखोरी करत अपक्ष लढण्याच्या विचारात आहेत. यामुळे एकूणच राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या विधानावरून महायुतीतील भाजप मंत्र्यांनी (BJP Minister) त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपच्या इन्कमिंग वर बोलताना शरद पवार म्हणाले, ” शिस्तीचा पुरस्कार करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या त्या पक्षातून लोक आता बाहेर पडत आहेत. जुन्या काळातील जनसंघ किंवा भाजपचा कार्यकर्ता संघटनेची चौकट मोडून कधीही बाहेर जाणारा नव्हता, त्याचे कारण तेव्हाचे नेतृत्व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारे होते. आज ही स्थिती राहिलेली नाही.
ठराविक लोकांच्या हातात सत्ता ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक बाहेर पडत आहेत, हा अनुभव त्याच पक्षातील एका नेत्याने मला सांगितला. मागील दोन महिने आमच्या पक्षाकडे येणाऱ्या लोकांची आवक वाढली आहे. आमच्याकडे येणारे ८० टक्के लोक भाजपातून येत आहेत”, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याला भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ” ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली. त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे इन्कमिंग भाजपात होईल. ठाकरे गटातून तर अनेक लोक येतील, मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे “, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ” तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले. तुम्ही काय परिवर्तन केले. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. समन्यायी पाणी वाटपाचे भूत यांच्याच काळात राज्यावर आले. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार “, अशा शब्दात विखे पाटलांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.
Comments are closed.