नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील प्रत्येक आई आपल्या बाळावर अमर्याद प्रेम करते. जेव्हा बाळावर एखादे संकट येते तेव्हा ती मोठ-मोठ्या संकटांना तोंड देते आणि आपल्या बाळाला वाचवते, अशावेळी तिला स्वत:च्या जीवाची देखील पर्वा नसते. सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये एक हरिण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका अजगाराला टक्कर देते. हा व्हिडिओ @iftirass नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे.
أفعى البايثون تعصر صغير الغزال..
الأم تحاول إنقاذه لكن دون جدوى…؛ pic.twitter.com/FJHkXuYcyb— إفتراس | prey (@iftirass) June 29, 2020
या व्हिडिओत दिसत आहे की, कोणत्या तरी जंगलात झाडा झुडपांमध्ये एका अजगराने हरिणाच्या पिल्लाला पकडून ठेवले आहे. हरिणाचे पिल्लू त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहे, परंतु अजगराने हरिणाचे हे पिल्लू आपल्या विळख्यात घट्ट पकडल्याने ते तडफडत आहे. अजगर हळुहळु हरिणाच्या पिल्लाला मारून गिळण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात पिल्लाची आई तिथे पोहचते.
ती आपल्या बाळाला वाचवण्यासाठी वारंवार अजगराच्या जवळ जाऊन त्यास तोंडाने चावा घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करते, प्रत्येक वेळी तोंड तिच्याकडे करून तिच्यावर सुद्धा हल्ला करताना दिसत आहे, हरिण आपल्या बचावासाठी मागे सरकत आहे, आणि पुन्हा पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान अजगराच्या विळख्यात अडकलेले पिल्लू जोरजोरात ओरडत आहे. आई अनेक प्रयत्न करत आहे..पण काहीच फायदा होत नाही. हा व्हिडिओ शेयर करताना लिहिले आहे की, एक अजगर हरिणाच्या एका पिल्लाला आवळत आहे, आई त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु काहीही उपयोग झाला नाही.