PV Sindhu ने ’Loves Nwantinti’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, वायरल झाला Video

PV Sindhu | badminton player pv sindhu dance on love nwantinti song and video goes viral on social media

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  PV Sindhu | राष्ट्रपती भवनात देशाच्या राष्ट्रपतींनी 141 लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. या दरम्यान क्रीडा जगतातून बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधु (P. V. Sindhu) ला पद्मभूषण (Padma Bhushan) ने सन्मानित करण्यात आले. ती दोनवेळा ऑलम्पिक पदक विजेता ठरली आहे. देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कर पद्म भूषणने सन्मान्मित होण्याच्या काही काळ अगोदर पी. व्ही. सिंधुने सोशल मीडियावर आपला एक डान्स व्हिडिओ (dance video) शेयर केला होता. जो खुप वेगाने वायरल होत आहे.

 

व्हिडिओमध्ये सुंदर डान्स मूव्हज (P. V. Sindhu dance video)

 

बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधुने (PV Sindhu) इंस्टाग्रामवर सी.के.चे गाणे ’Love Nwantiti’ वर एक इंस्टाग्राम रिल बनवली होती.
जी शेयर केल्यानंतर हा व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये पी. व्ही. सिंधुने सी ग्रीन कलरचा कांजीवरम लेहंगा परिधान केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या सुंदर डान्स मूव्हज सोशल मीडियावर लोकांना वेड लावत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सोशल मीडियावर धूम

 

सध्या हा डान्स व्हिडिओ पी. व्ही. सिंधुने दिवाळी पोस्टची एक सीरीज म्हणून शेयर केला होता. इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर एक दिवसाच्या आत या व्हिडिओला 4 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मोठ्या संख्येने यूजर्स पी. व्ही. सिंधुच्या डान्सचे कौतूक करत आहेत.
अनेक यूजर्सला तिच्या डान्स मूव्हजने वेड लावले आहे. यूजर्स व्हिडिओवर लव्ह रिअ‍ॅक्ट करत आहेत.

 

पद्मभूषणने सन्मानित झाली पी. व्ही. सिंधु

 

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या एका सोहळ्यात सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी पी. व्ही. सिंधुला पद्मभूषणने सन्मानित केले.
पद्मभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर पी. व्ही. सिंधुने म्हटले, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या पुरस्कारासाठी मी भारत सरकार, सर्व मंत्री आणि राष्ट्रपती महोदयांची आभारी आहे. मी खुप आनंदी आहे.

 

Web Title : PV Sindhu | badminton player pv sindhu dance on love nwantinti song and video goes viral on social media.

Pune Rains | पुणे शहर आणि परिसरात पुन्हा हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज; जाणून घ्या राज्यातील पावसाचा अंदाज

Mumbai Cruise Drugs Case | मुंबई पोलिसांच्या एसआयटी चौकशीत मोठा खुलासा; जाणून घ्या ड्रग्स प्रकरणात कशी झाली वसुली? ‘त्या’ सेल्फीमुळं पर्दाफाश

Devendra Fadnavis | 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली, देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपात भागीदारी देण्याच्या आमिषाने 1.16 कोटीची फसवणूक; अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द FIR