अमृतसर : वृत्तसंस्था – प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेला तिच्या पतीने रंगेहाथ पकडले. त्यांना दोघांना एकत्र पाहून त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने तिला तिथेच मारहाण करायला सुरुवात केली. पंजाबच्या अमृतसरमध्ये हा प्रकार घडला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये घटस्फोटाची केस सुरू होती. मात्र, पतीकडून पैसे घेऊनही महिलेने घटस्फोट देण्यास नकार दिला.
महिला तिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. त्यानंतर पती आणि त्याचे काही मित्र त्या हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमधून त्याची पत्नी प्रियकरासोबत खोलीतून बाहेर पडताच त्याने तिच्या कानशिलात लगावली. महिलेचा पती पोलीस कॉन्स्टेबल आहे. तो जालंधरचा रहिवासी आहे. त्याची पत्नी गुरुदासपूर येथील राहणारी आहे.
6 वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. लहान-सहान गोष्टींवरून त्याच्यासोबत ती भांडण करायची. अनेकदा वाद घातल्यानंतर ती माहेरी निघून जायची. दोघांमधील वाद पंचायतीने मिटवलाही होता. तर महिलेचा प्रियकर हा एसजीपीसीमध्ये नोकरी करतो. पत्नीचे बऱ्याच महिन्यांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत, असा आरोप पतीने केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेची आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली जात आहे.