बहुजननामा ऑनलाइन टीम – यावर्षीही लॉकडाऊनमध्ये पुणेकरांनी(Punekar ) परदेशी मद्य रिचवण्यात मुंबईकरांना धोबीपछाड दिला आहे. पुणेकर हे मुंबईकरांपेक्षा कमी नाहीत हे यावर्षीही पुन्हा सिद्ध झालं आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागानं याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. इतकंच नाही तर औरंगाबादकरांनीही याबाबतीत मुंबईल मागे टाकलं आहे.
कोरोनाच्या काळात सारं काही ठप्प झालं होतं. राज्याची अर्थव्यवस्थाही पूर्णपणे ठप्प झाली होती. अशा वेळी मद्यपी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता. लॉकडाऊनच्या काळात मद्यपींनी अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यात मोठं योगदान दिलं. राज्याच्या तोजारीत भरमसाठ पैसा आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 या वर्षभरात पुणेकरांनी नोव्हेंबर महिन्यात 185.24 लाख लिटर परदेशी मद्य रिचवलं. परदेशी मद्य रिचवण्यात पुणेकरांनी मुंबईकरांना मागे टाकलं आहे. मुंबईसह उपनगरीत लोक 170.05 लाख लिटर परदेशी मद्य पायले. तर पुणे आणि मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनी 144.71 लाख लिटर परदेशी मद्य सेवन केलं. सर्वात कमी म्हणजे फक्त 3.08 लाख लिटर मद्य सिंधुदुर्गकरांनी रिचवलं. पुणेकरांनी मात्र फक्त परदेशी मद्यच नाही तर बिअर आणि वाईन पिण्यातही मुंबईसह सर्वांना मागे टाकलं आहे.
कुणी किती वाईन आणि बिअर रिचवली ?
– वर्षभरात पुणेकरांनी 170.75 लाख लिटर फक्त बिअर पिली आहे.
– 157.97 लाख लिटर बिअर उपनगरीय मुंबईकरांनी रिचवली.
– सर्वात कमी बिअर हिंगोलीकर प्यायले. त्यांनी 3.78 लाख लिटर बिअर रिचवली.
– 7.59 लाख लिटर वाईन पुणेकर प्यायले.
– 7.20 लाख लिटर वाईन उपनगरीय मुंबईकर प्यायले.
– सर्वात कमी म्हणजे 0.05 लाख लिटर वाईन गोंदिया आणि हिंगोलीकर प्यायले.
राज्याच्या उपराजधानीत सर्वात जास्त देशी मद्य प्यायली गेल्याची माहिती समोर आली आहे.
कुणी किती देशी मद्य रिचवलं ?
– 150.47 लाख लिटर देशी मद्य नागपूरकर प्यायले.
– 146.42 लाख लिटर देशी मद्य पुणेकर प्यायले.
– 126.42 लाख लिटर देशी मद्य नाशिककर प्यायले.
– फक्त 5.88 लाख लिटर देशी मद्य सिंधुदुर्गकर प्यायले.
राज्याला काय फायदा ?
एवढ्या प्रमाणात मद्य रिचवण्याचा राज्याला भरपूर फायदा झाला. राज्याला मद्य विक्रीतून अपेक्षा नसतानाही तब्बल 7776.66 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यावेळी राज्याच्या महसूलात औरंगाबादकरांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. पुणेकर यात मागे पडले आहेत.
– औरंगाबादकरांनी मद्य विक्रीतून राज्याला 1837.81 कोटी रुपये महसूल मिळवून दिला.
– नाशिककरांनी मद्य विक्रीतून राज्याला 1814.53 कोटी रुपये महसूल मिळवून दिला.
– पुणेकरांनी मद्यविक्रीतून राज्याला 1019.78 कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला.
– वाशिमकरांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 1 कोटी 61 लाख एवढा महसूल मद्यविक्रीतून राज्याला मिळवून दिला आहे.
32238 अवैध विक्रीचे गुन्हे दाखल
कोरोना काळात अवैध मद्यविक्री जोरात सुरू असल्याचं दिसून आलं. या काळात तब्बल 32238 अवैध विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष बाब अशी की, या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इतकंच नाही तर 19462 अवैध मद्यविक्री करणाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागानं अटक केली. अवैध मद्यविक्रीसाठी वापरण्यात आलेल्या 2663 गाड्या देखील उत्पादन शुल्क विभागानं जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली आहे.