बहुजननामा ऑनलाइन टीम – दूध घेऊन घराकडे निघालेल्या एका पादचारी महिलेचे मंगळसूत्र सोन साखळी चोरट्यांनी हिसकावल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घडली. पाठलाग करुन या चोरट्याने ३३ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले आहे.
याप्रकरणी संध्या कदम (वय ४८, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन साखळी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या गृहिणी आहेत. त्या शिवशक्ती सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी सकाळी पावणेसातच्या सुमारास त्या दुकानातून दुध घेउन पायी चालत घरी चालल्या होत्या.
त्यावेळी पाठीमागून चालत आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३३ हजारांचे मंगळसूत्र हिसका मारुन तोडून नेले. त्यांनी आरडा-ओरडा केला. पण तोपर्यंत चोरट्याने धूम ठोकली होती. माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक विवेक रसाळ करीत आहेत.