Pune Weather Update | पुण्यात ऊन पावसाचा लपंडाव? पुढील चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

May 15, 2024

पुणे :  – Pune Weather Update | कधी लख्ख उन, तर कधी ढगाळ वातावरण आणि मधूनच बरसलेल्या काही जोरदार सरी, असे वातावरण सोमवारी पुण्यात अनुभवायला मिळाले. शहर आणि परिसरात दिवसभर ऊन आणि संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा मिळत असला तरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे. पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर सोमवरी मतदान झाल्यानंतर लगेच शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. IMD च्या आडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये रात्री साडेआठपर्यंत 2.9 मिमी पावसाची नोंद झाली. (Pune Rains)

पुणे शहरामध्ये सोमवारी दुपारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण जाणवत होते. मतदानासाठी आलेल्या अनेकांना उष्ण हवामानाचा त्रास सहन करावा लगला. मात्र, साडेपाचनंतर पुणे शहर व परिसरात ढग तायर होऊन लगाल्याने वातावरणात बदल झाला. पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला. गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात पाऊस पडत असून 11 आणि 12 मे रोजी शहरात शिवाजीनगर येथे 28 आणि 40.4 मिमी पावसाची नोंद झाली.

कोणत्या भागात किती पाऊस?

बारामती १०.५ मिमी, गिरिवन १०.५ मिमी, निमगिरी ९.५ मिमी, लावळे ७.५ मिमी, बल्लाळवाडी ५ मिमी, दौंड ५ मिमी, हडपसर ४.५ मिमी, हवेली ४.५ मिमी, एनडीए ३.५ मिमी, कोरेगाव पार्क ३ मिमी, शिवाजीनगर २.९ मिमी, वडगावशेरी २.५ मिमी, ढमढेरे २.५ मिमी, लोहगाव २.२ मिमी, मगरापट्टा २ मिमी, पुरंदर २ मिमी, माळीण १.५ मिमी, पाषाण १.४ मिमी, खेड १ मिमी, राजगुरुनगर ०.५ मिमी

हवामान खात्याचा ‘येलो अलर्ट’

राज्यात पुण्यासह 26 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. 14) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील, असा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे. उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला असून राज्यात उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Hadapsar Pune Crime | पुणे : मैत्रीचं प्रेमात रुपांतर, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला लैंगिक अत्याचार