पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहरातील पाणीपुरवठाच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4, खराडी (kharadi) मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडी मध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे (Pune Water Supply) नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार पासून (10 जून) खराडी मध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ
शुक्रवार, रविवार, मंगळवारी दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, पीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. चौधरी वस्ती, सातव वस्ती, पंढरी नगर, गुलमोहर, रक्षक नगर, शंकरनगर भागाला सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या कालावधीत शुक्रवारी, रविवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा होईल. (Pune Water Supply)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शनिवार, सोमवार, बुधवारी या दिवशी दुपारी 1.30 ते सायंकाळी 6.00 यावेळेत बोराटे वस्ती गल्ली नं. 1 ते 13,
शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्र नगर, यशवंत नगर, तुकाराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क,
साईबाबा मंदिर परिसर. तर सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 या वेळेत गणपती सोसायटी, तुकाराम नगर, बोराटेवस्ती,
झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर परिसराला पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी नव्या वेळापत्रकानुसार सहकार्य करावे,
असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून (Water Supply Department) करण्यात आले आहे.
Web Title : Pune Water Supply | day by day water supply in pune change in water supply in chandannagar kharadi area
- Palkhi Sohala 2023 – RTO Office Pune | पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल
- Maharashtra Police News | काय सांगता ! होय, पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे (PhonePe) वरून वसुली (Hafta Vasuli), वरिष्ठांनी केली कडक कारवाई
- ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळयात
- Jalna ACB Trap News | 32 हजाराची लाच घेणार्या सरपंचास अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले