Pune Traffic Updates | डेक्कन, कोरगाव पार्क वानवडी वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेतील बदलांबाबत अंतिम आदेश जारी

Parking Update

पुणे : Pune Traffic Updates | पुणे शहर वाहतूक विभागाच्यावतीने शहरातील पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत (Deccan Traffic Division) प्रभात रोडवरील (Prabhat Road Pune) गल्ली क्र.१ मध्ये दक्षिणेस प्रथमेश सोसायटी व उत्तरेस पश्चिमेस अमित बोसम सोसायटीपर्यंत पी-१ व पी-२ दुचाकीकरीता तसेच दक्षिणेस असलेले लक्ष्मी निवास ते उत्तरेस असलेला अभिनंदन बंगलादरम्यान, दक्षिणेस असलेल्या लक्ष्मी निवास ते ग्रीनपार्क यातील सोसायटीचे प्रवेशद्वारसोडून, उत्तरेस असलेला अभिनंदन बंगला ते निसर्ग सोसासटी या ठिकाणी सोसायटीचे प्रवेशद्वारसोडून पी-१ व पी-२ चारचाकी वाहनाकरीता पार्कीग करण्यात येत आहे. तसेच उत्तरेस असलेल्या निसर्ग सोसायटीच्या बाहेरील बाजूस असलेले अॅड. अभ्यंकर चौक या ठिकाणी १५ फुट अंतरावर चारचाकी वाहनाकरीता पार्कीगची व्यवस्था करण्यात येत आहे.

कोरगाव पार्क वाहतूक विभागाअंतर्गत (Koregaon Park Traffic Division) कोरगाव पार्क लेन क्र. ७ (Koregaon Park Lane 7) रस्त्याच्या पूर्व बाजूस असणाऱ्या क्लोवर सोसायटी प्रवेशद्वार (ए) ते क्लोवर पार्क व्हयु सोसायटी प्रवेशदारापर्यंत एका बाजूला नो-पार्किंग करण्यात येत आहे.

वानवडी वाहतूक विभागाअंतर्गत (Wanawadi Traffic Division) ॲव्हेन्यु मॉलच्या मुख्य प्रवेशदापासून ५० मी. उजव्या बाजूस व ५० मी डाव्या बाजूस नो- पार्किंग करण्यात येत आहे, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी कळविले