Pune Traffic Police | नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल, शिवाजी रस्ता शनिवारी (उद्या) वाहतुकीस बंद

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – नववर्षाचे स्वागत (Happy New Year) प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुण्यातील मध्यवस्थीत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) दर्शनासाठी हजारो भावीक येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) वाहतुकीत बदल केले आहे. दि. 1 जानेवारी रोजी दरम्यानच्या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करवा असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) करण्यात आले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (Chhatrapati Shivaji Maharaj Road) शनिवारी (1 जानेवारी) सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shriram) यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पर्यायी रस्ता – बाजीराव रस्त्याने (Bajirao Road) शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने (Tilak Road) अलका चित्रपटगृह चौकमार्गे (Alka Chowk) डेक्कन जिमखान्याकडे (Deccan Gymkhana) जावे. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे (Swargate) जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
Web Title :- Pune Traffic Police | Shivaji Road closed to traffic on Saturday (tomorrow)
Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक
Comments are closed.