कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता- बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रल्हाद पोटे

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीची तिसरी लाटेमध्ये तज्ज्ञांच्या मते लहान मुलांचे प्रमाण जास्त असणार आहे. आतापर्यंत 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. 18 वर्षांखालील मुलांसाठी लसीकरण असून, भारतामध्ये लहान मुलांचे प्रमाण 40 टक्के आहे. त्यामुळे लहान मुलांवर त्याचा परिणाम होणार आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे प्रौढांपेक्षा वेगळी आहेत. सर्दी खोकला हे लहान मुलांमधील कॉमन आजार आहेत, त्यामुळे फसगत होण्याची शक्यता आहे. निदान होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जागरूकता करणे, ही मोठी गरज आहे. हडपसरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मोठी जबाबदारी सांभाळली आहे, असे मत नोबल हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रल्हाद पोटे यांनी सांगितले.
हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोरोना महामारीच्या तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञांशी बैठक आयोजित केली होती.
याप्रसंगी हडपसर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, सचिव डॉ. राहुल झांजुर्णे, कोषाध्यक्ष डॉ. मनोज कुभांर, माजी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, माजी अध्यक्ष मंगेश वाघ, बालरोगतज्ज्ञ डॉ. जितेंद्र देशुमख, डॉ. संजीव डोळे, डॉ. दुर्वास कुरकुटे, डॉ. मनोज झालटे, डॉ. संतोष शिंदे, डॉ. योगेश सातव, डॉ. महेश शिंदे, डॉ. अनिल खामकर, डॉ. जवळकर, विभागीय वैदयकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, पालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल काळे व बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी डॉ. जितेंद्र देशमुख, डॉ. अनिल खामकर, डॉ. दुर्वास कुरकुटे, डॉ. राजीव डोळे, डॉ. मनोज झालटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये मागिल वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. आता तिसरी लाट येत असून, लहान मुलांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे हडपसरमध्ये त्यासाठी उपाययोजना करून वेळीच उपचार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आमदार आणि खासदार यांच्या निधीतून पायाभूत सुविधांसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, त्यासाठी आवश्यक गोष्टी तातडीने सूचवावेत त्याची पूर्तता लवकरच केली जाईल. तसेच, पालिकेच्या जागेमध्ये हडपसर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स ओपीडी चालवतील, जनरल फिजिशियनकडे जास्तीची जबाबदारी द्यावी लागणार आहे, रुग्ण आणि परिवाराला धीर देणे ही महत्त्वाची बाब असणार आहे. लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा विकत घेण्यासाठी सीएसआर, लोकवर्गणी आणि आमदार निधी वापरला जाईल. तसेच नोबल हॉस्पिटल लहान मुलांच्या उपरासाठी १०० बेड सुविधा उपलब्ध करून देणार असून, त्यातील २५ अतिदक्षता बेड असणार आहेत, लहान मुलांसाठी वापरात येणारे व्हेंटीलेटर राखीव ठेवावे लागणार आहेत, लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे वेगळी असणार आहेत, हॉस्पिटल चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करावे लागणार आहे, जंबो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी १०० बेड राखीव ठेवावे लागतील, डॉक्टरांनी जनजागृतीचे व्हीडिओ तयार करून प्रसार करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हडपसर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव डॉ. राहुल झांजुर्णे यांनी आभार मानले.
Comments are closed.