पिपंरी : बहुजननामा ऑनलाईन – दुकानात चॅर्जिगसाठी ठेवलेल्या मजूरांच्या मोबाईलच्या नंबरवरुन दुकानात आलेल्या महिलांचे नंबर घेऊन त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवून अश्लिल मेसेज करणार्याला वाकड पोलिसांनी Wakad police अटक केली. संपत राम (रा. चहाचे दुकान, रामदेव सुपर मार्केटजवळ, बाणेर, मुळ गाव जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाकड येथील एका महिलेला दोन वेगवेगळ्या व्हॉटसअॅप नंबरवरुन अश्लिल मेसेजेस व अश्लिल व्हिडिओ कॉलिंग करुन विनयभंग करण्यात आला होता.
वाकड पोलीस Wakad police ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी तपास पथकाला आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सुनिल टोणपे, सहायक निरीक्षक एस. एम. पाटील यांनी ज्या मोबाईलवरुन हे मेसेजेस आले होते. त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात हे फोन बाणेर येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्या मोबाईलधारकांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाईलचा दुसर्याने वापर केल्याचे आढळून आले.
अधिक तपासात चहाच्या दुकानातील संपत याने हा प्रकार केल्याचे उघउकीस आले.
त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोबाईल, तीन वेगवेगळे सीम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीचे चहाचे दुकान होते. त्याच्याकडे येणारे गरीब मजूर त्यांचा मोबाईल चर्जिंगला लावून कामाला जात असायचे. त्यापैकी साधे मोबाईल ज्यामध्ये व्हॉटसअॅप नसते. अशा मोबाईल नंबरचे व्हॉटसअॅप त्याचे स्वत:चे मोबाईलमध्ये चोरुन घेऊन त्यावरुन तो गुन्हे करीत होता. तसेच तो पूर्वी फर्निचरच्या दुकानात काम करीत होता. त्यावेळी दुकानात आलेल्या ग्राहकांचे नंबर त्याने स्वत:कडे ठेवलेले होते. त्या नंबरवर तो अशा प्रकारचे कॉलिंग करून त्यांना त्रास देत असायचा. त्याने फिर्यादीप्रमाणे इतरही काही महिलांना अशा प्रकारे अश्लिल मेसेजेस व अश्लिल व्हिडिओ कॉल करुन त्रास दिला असण्याची शक्यता आहे. त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
कृपया हे देखील वाचा:
पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची, भाजप नेत्याची राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर जोरदार टीका
काय सांगता ! होय, मुंबईत पोलिसानेच घातला सराफाला 1.25 कोटींचा गंडा