पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात नवविवाहित तरुण डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (In Pune, a newly married young doctor couple committed suicide by hanging themselves at their residence) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फोनवर वाद झाल्यानंतर पत्नीनं आत्महत्या केली. हे पाहून नैराश्यात असलेल्या पतीनं सकाळी आत्महत्या (Pune Suicide News) केली आहे. ‘नॅशनल डॉक्टर डे’च्या (National Doctors’ Day) दिवशीच ही घटना समोर आल्यानं पुणे शहरात (Pune City) प्रचंड खळबळ उडाली आहे. (Suicide of a newly married doctor couple in Pune on the day of ‘National Doctor’s Day’)
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 27) Nikhil Dattatraya Shendka व पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय 26) Ankita Nikhil Shendkar असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) आकस्मिक मृत्यूची (Accidental death) नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, वानवडी (Wanawadi ) येथील आझादनगर भागात (Azadnagar) हे दोघे राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते.
त्यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होत असत.
काल (बुधवारी) निखिल काम संपल्यावर घरी येत असताना दोघांचे फोनवर वाद झाले.
हे वाद झाल्यानंतर अंकिताने रागात फोन ठेवला.
निखिल नेहमीप्रमाणे घरी आला. त्यावेळी पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला होता
. या नैराश्यातून निखिलनेही आज सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार समजताच वानवडी पोलिसांनी (Wanawadi police) घटनास्थळी धाव घेतली.
अधिक तपास पोलीस वानवडी पोलीस (Wanawadi police) करत आहेत.
Web Titel : Pune Suicide News Suicide of a newly married doctor couple in Pune on the day of National Doctor s Day
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update