पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कामगारांना दोन महिन्यांपासून वेतन दिले नाही. त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कमही न भरलेल्या ठेकेदाराला मिळालेली निविदा(Tender) ‘रद्द’ करणार्या स्थायी समितीने आठवड्याभरात या निविदेचा(Tender) ‘फेरविचार’ केला आहे. विशेष असे कि एरव्ही ‘भ्रष्टाचारा’वरून एकमेकांविरोधात रान पेटवणार्या राजकिय पक्षांनी ‘एक दिलाने’ हा प्रस्ताव मंजुर केल्याने निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील ‘आर्थिक ’ बाजार गरम झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महापालिकेच्या परिमंडळ तीनमधील धनकवडी सहकारनगर कार्यालयाअंतर्गत झाडण कामासाठी जानेवारी महिन्यांत निविदा काढण्यात आली होती.
सुमारे ६ कोटी ५० लाख रुपयांच्या या निविदेसाठी तीन ठेकेदारांच्या निविदा आल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दराची निविदा प्रशासनाने मागील आठवड्यात मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवली होती.
या निविदेवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपसह काही सदस्यांनी संबधित ठेकेदाराने कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन थकविले आहे.
कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. संबधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा अशी जोरदार मागणी केली.
प्रशासन या आरोपांचे पुरेसे स्पष्टीकरण देउ न शकल्याने स्थायी समितीने एक मुखाने ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये भाजपच्याच दोन सदस्यांनी रद्द केलेल्या निविदेचा फेरविचार करून मूळ निविदा मंजुर करण्याचा प्रस्ताव ठेवला.
हा प्रस्ताव मंजुर करावा यासाठी कॉंग्रेस आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकर्यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना विनंती केली.
संबधित ठेकेदाराला निविदा मिळाल्यास मागील दोन महिन्यांपासून स्वच्छतेचे काम करणार्या त्याच्या कर्मचार्यांचे वेतन मिळू शकेल.
संबधित ठेकेदारही गंभीर आजारी आहे, अशी सबबही सांगितली. अखेर स्थायी समितीने एकमताने फेरविचाराचा प्रस्ताव मान्य करत निविदेला मंजुरी दिली.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने
यांनी या घटनाक्रमाला दुजोरा दिला आहे.
स्थायी समिती सदस्य तसेच सर्वच राजकिय पक्षांची या भुमिकेवरून मात्र पालिका वर्तुळामध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाली.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सत्तेतून बाहेर पडलेले आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभाराचे आश्वासन देउन सत्तेत आलेल्या राजकिय पक्षांना आठवड्याभरात कोणता साक्षात्कार झाला? स्वत:च संबधित ठेकेदारांविरोधात वातावरण गरम करायचे आणि स्वत:च पाठराखण करायची.
यामुळे अगोदरच विलंबाने झालेले निर्णय आणखी लांबणीवर टाकण्यामागे केवळ ‘आर्थिक’ बाजार गरम करण्याची खेळी सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 286 नवीन रुग्ण, 282 रुग्णांना डिस्चार्ज
चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय होणार? हे सरकार कोडगं’
खरंच भारत सरकार 3 महिन्यांसाठी 10 कोटी युजर्संना फ्री इंटरनेट देणार? जाणून घ्या ‘सत्य’
दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 858 रूग्ण ‘कोरोना’मुक्त