बहुजननामा ऑनलाइन टीम – जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावानेच भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडल्याची धक्कादायक (Pune)घटना जुन्नर तालुक्यातील सावरगावजळील एकनाथवाडी येथे सोमवारी ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गावातील मुख्य चौकात झालेल्या या प्रकाराने परिसरात(Pune) खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला व गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (MHI 14 HQ 3302) ताब्यात घेतला आहे.
प्रकाश नामदेव मनसुख (वय-58) असे मृत भावाचे नाव आहे. जयनाथ सोपान मनसुख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश मनसुख यांच्या अंगावर त्यांचाच चुलत भाऊ आरोपी जयनाथ सोपान मनसुख याने सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर प्रकाश यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. पण मंगळवारी रात्री उपचारादरम्यान 12.30 वाजेच्या सुमारास प्रकाश मनसुख यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज मंगळवारी सकाळी घटनास्थळी जुन्नरचे पोलीस व तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बेदरे यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.