पुणे : बहुजननामा ऑनलाईन – चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यास गेल्यानंतर पोलिसांना पाहून त्याने चाकूने व ब्लेडने स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने पोलीस पाहून दुचाकीवर पळ काढला अन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पण, तो उरुळी कांचनजवळ दुचाकी स्लिप होऊन पडला आणि त्यानंतरही पोलीस दिल्यानंतर आत्महत्याचा प्रयत्न केला.
बल्लूसिंह प्रभू सिंह टाक (वय 30, रा. धनगरवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अमित साळुंखे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घरफोडीचा एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात टाक हा संशयित आहे. दरम्यान त्याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यास पोलीस गेले होते. यावेळी तो पोलिसांना पाहून दुचाकीवर पळ काढला. सुसाट दुचाकी उरुळी कांचन परिसरात आली असता तो स्लिप होऊन खाली पडला. यावेळी पोलीस मागावर असल्याचे पाहून त्याने खिशातून चाकू व ब्लेड काढून घेत थेट स्वतःवर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला लागलीच पोलीस पथकाने पकडले आणि रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.