बहुजननामा ऑनलाइन टीम – बीएमडब्ल्यू कारवर लघुशंका करू नको, असे सांगणाऱ्या सुरक्षारक्षकाला रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून जिवंत (security-guard-set-ablaze-by-
याप्रकरणी महेंद्र बाळू कदम (वय 31) या रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली आहे, तर शंकर भगवान वायफळकर (वय 41) असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर भगवान वायफळे हे सुरक्षारक्षक आहेत. ते भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीच्या गेटवर कर्तव्य बजावत होते. तेव्हा आरोपी रिक्षाचालक महेंद्र कदम गेटजवळ कंपनीच्या मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत होता. त्यावेळी शंकर यांनी हटकले आणि लघुशंका करण्यास मज्जाव केला. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि आरोपी कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला. त्यानंतर तो साडेचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा आला. त्याने येताना बाटलीतून आणलेले पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून त्यांना जाळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात शंकर गंभीर जखमी झाले असून, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.