बहुजननामा ऑनलाइन – सासवड तहसील कार्यालयातील लिपीकास 6 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. फेरफार नक्कल काढण्यास त्याने लाच घेतली. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली आहे.
महंमद रफीभाई गनिभाई मुलाणी (वय 51) असे पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.
मुलाणी हे सासवड तहसील कार्यालय येथे लिपिक आहेत. यावेळी तक्रारदार यांनी तहसील कार्यालयात सातबारा व फेरफारची नक्कल मिळण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी लोकसेवक मुलाणी याने नक्कल देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सापळा कारवाईत मुलाणी याना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.