शिक्रापूर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) : बहुजननामा ऑनलाईन- शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सतरा कमान चौक येथे गजाआड केले असून अटक केलेल्या आरोपीवर 16 गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
या प्रकरणी अण्णा लक्ष्मण गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक १७/०५/२०२१ रोजी मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक covid -19 चे अनुषंगाने पुणे-नगर रोडवर पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिक्रापूर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोप अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय ३६ रा.घोडेगाव ता.नेवासा जि. अहमदनगर) हा सतरा कमान चौक येथे आलेला आहे. यावेळी पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता घोडनदी पुलाजवळ संशयित व्यक्ती दिसला. पोलिसांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अण्णा लक्ष्मण गायकवाड वय ३६ रा.घोडेगाव ता.नेवासा जि. अहमदनगर असे सांगितले तसेच इथे थांबले बाबत विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली असता त्याचे पूर्व रेकॉर्ड पाहिले असता त्यांचेवर या पूर्वीचे एकूण १६ गुन्हे दाखल आहे. त्या नुसार पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून शिक्रापूर पोलिसांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फोजदार दत्ता जगताप, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, अक्षय जावळे याचे पथकाने केली.