पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Rural Police | पदोन्नती (Promotion) कोणत्याही सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. पोलीस दलातील पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाते. पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलात कार्यरत असणाऱ्या 223 अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) यांनी मंगळवारी (दि.10) आदेश काढले आहेत..
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे ग्रामीण पोलीस दलातील 223 पोलीस अंमलदरांना पदोन्नती (प्रमोशन) देण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी (दि.10) आदेश काढले आहेत. यामध्ये 31 पोलीस हवालदार (Police constable) यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील 64 पोलीस नाईक (Police Naik) यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. तर 128 पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले.
Web Title : Pune Rural Police | Promotion of 223 Police Officers in Pune Rural Police Force
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा