पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गेले दोन महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, सध्या रुग्णाच्या संख्येत घट पाहता निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु अजूनही पर्यटन (tourists) स्थळांना ग्रामीण भागात परवानगी देण्यात आली नाही. अशातच सुट्टीचा दिवस साधून (रविवार) पुण्यातील लोणावळा, मुळशी आणि सिंहगड या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने फिरण्यास येत आहेत. तर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) दंडात्मक कारवाई केली आहे.
लोणावळा, मुळशी, सिंहगड परिसरात फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांवर रविवारी (दि.13) या दिवशी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक लोक फिरण्यास बाहेर पडले आहेत.
लोणावळा ठिकाणी रविवारीच्या दिवशी सकाळच्या दरम्यान फिरण्यास येणाऱ्यांची संख्या अधिक होती.
वाहनांची रंग लागली होती यामुळे वाहतूकही भरगच्च कोंडी झाली होती.
याचबरोबर भुशी धरण, पवन मावळ, आंदर मावळ या ठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी झाली होती.
तसेच, सिंहगड, पानशेत आणि खडकवासला धरण या ठिकाणीही भरगच्च पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली.
मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) पर्यटकांकडून दंड वसुली करून पर्यटकांना माघारी पाठवण्यात आले.
दरम्यान, रविवारी पोलिसांनी पर्यटकांकडून तब्बल 75 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
या दरम्यान, कोरोना च्या पार्श्वभुमीवर अद्यापही काही ठिकाणी नियम लागू असल्याने वेल्हे पोलिसांनी तोरणा, राजगड आणि मढेघाट धबधबा या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घातली आहे.
त्याचप्रमाणे पर्यटकांची चौकशी करण्यासाठी करंजवणे याठिकाणी तपासणी नाके देखील तयार करण्यात आला आहे.
कृपया हे देखील वाचा:
भगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम
दुर्दैवी ! भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना
Ajit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने वाढवा
महाविकास आघाडीत फूट ? प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार