पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मांजरी उपबाजार आणि लगतच्या सोसायटीच्या सांडपाणी व मलवाहिनी तुंबल्यामुळे चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहू लागले. त्यामुळे मांजरी उपबाजार आणि लगतच्या सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले होते. मांजरी उपबाजारप्रमुख विजय घुले यांनी तातडीने ग्रामसेवक दाते यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने चेंबर आणि वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले, असे घुले यांनी सांगितले.
घुले म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजार आवार व शेजारच्या परिसरातील सोसायटीचे सांडपाणी मलवाहिनीद्वारे ओढ्यामध्ये सोडले आहे. मात्र, मुख्य मलवाहिनी चोकअप झाल्यामुळे चेंबर ओव्हरफ्लो झाली असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबतची माहिती मांजरी बु ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दाते यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी मांजरी उपबाजारचे विभागप्रमुख विजय घुले, आरोग्य विभागाचे गायकवाड, चेतन घुले, भैय्या तांबे, लिंबू व्यावसायिक संदीप शिकलकर, अक्षय काळे आणि अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने काम सुरू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.