रूग्ण मृत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी केली डॉक्टरांना मारहाण अन् हॉस्पीटलची तोडफोड, कोंढव्यातील प्रकार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रुग्णालयात आलेल्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर तो मृत झाल्याचे सांगताच चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टराना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तर त्या रुग्णालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.
याप्रकरणी डॉ. सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे प्राईम हॉस्पिटल आहे. तसे, हे मोठया रुग्णालयात मोडते. दरम्यान मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार्डीयाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती. घाई गडब्रूच्या डॉ. सिद्धांत तोतला यांनी या रुग्णांची तपासणी केली. पण, त्याची नाडी लागत नसल्याने फिर्यादी यांना त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना बोलावले. वरिष्ठ डॉ. ताबिश आणि डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली असता तो मयात असल्याचे लक्षात आले. या डॉक्टरांनी त्या ठिकाणी जमलेल्या नातेवाईकांना ही माहिती दिली.
दरम्यान आपला रुग्ण मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंधरा ते वीस जणांच्या जमावानेज डॉक्टरांहलर हल्ला केला. डसकव सिद्धांत तोतला यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. तर हॉस्पिटलचा अकाउंटं काम पाहणाऱ्या देखील मसफ मारहाण केली. तसेच हॉस्पिटलच्या समोरील दरवाजावर दगडफेक करत तोडफोड केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
Comments are closed.