पुणे : बहुजननामा ऑनलाइन – फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीसोबत सहज संवाद साधू शकतो. पण याच माध्यमाचा वाईट अनुभव देणारी घटना पुण्यात घडली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 13) उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय साबळे (रा. दत्तनगर, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अक्षय या दोघांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर झाली. त्यानंतर ते दोघे सतत एकमेकांना बोलत असायचे. संवादातून आरोपीने अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन केला. मंगळवारी (दि. 13) दुपारी तरुणीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसला. तरुणी एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीची आई घरी आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.