पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Rape Case | सोशल मिडियावरुन झालेल्या ओळखीतून तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अरुण सोमनाथ शिंदे (वय 21, रा. पिंपरी, नातेपुते, सोलापूर) याला अटक (Pune Rape Case) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका 17 वर्षाच्या मुलीने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2020 ते जुलै 2021 पर्यंत घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी मुळची उत्तर प्रदेशातील राहणारी आहे. तिचे Instagram वरुन आरोपी अरुण शिंदे याच्याबरोबर ओळख झाली होती. अरुण शिंदे याने या मुलीला ते लग्न करणार असल्याचे सांगून गेल्या 6 महिन्यांपासून वेगवेगळ्या लॉजवर तसेच भाड्याच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्याशी शारिरीक संबंध केले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण शिंदे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.
Web Title : pune rape case rape on 17 years old girl instagram loni kalbhor police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update