पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हडपसर परिसरात कुदळे चाळ (Kudale Chal Hadapsar) येथील एका घरावर मोठे लिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुटुंब बचावले आहे. अग्निशमन जवानांनी धाव घेऊन झाड कापून बाजूला केले आहे. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. पुण्यात गेल्या काही दिवंसापासून चांगलाच पाऊस (Pune Rain) पडत आहे. बुधवारी रात्री देखील परिसरात पाऊस (Pune Rain) पडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हडपसर भागात कुदळे चाळ (Kudale Chal Hadapsar) येथे दीपक कादबाने हे कुटुंबासमवेत रहावयास आहेत.. त्यांचे बैठे घर आहे. त्यांचा मुलगा पत्नी असे तिघे येथे राहतात. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात अधूनमधून हलके वारे देखील येत आहे. त्यामुळे झाडपडीच्या घटना घडत आहेत. दीपक यांच्या घराला लागून जुने लिंबाचे झाड होते. काल मध्यरात्री अचानक हे झाड कोसळले. दीपक यांच्या घरावरच ते कोसळले. दीपक व कुटुंब झोपेत असताना हा प्रकार घडला. पत्र्यावर झाड पडल्याने मोठा आवाज झाला. त्यावेळी दीपक व त्यांचे कुटुंब आणि शेजारचे रहिवाशी खडबडून जागे झाले. सुदैवाने यात दीपक कुटुंब सुखरूप आहेत. पण त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन जवानांनी धाव घेत काम करण्यास सुरुवात केली. हे झाड कापून पूर्ण बाजूला करण्यात आले आहे.
कोंढवा फायर स्टेशनचे (kondhwa fire station) अनिल गायकवाड, मंगेश काळे, सागर दळवी, सुभाष खाडे, धर्मराज माने, हर्षद येवले, अनिकेत गोगावले यांनी झाड कापून बाजूला केले.
Web Title :- pune rain | tree fall on home in kudale chal of hadapsar area in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Bakrid | बकरी ईदला जनावरांच्या कुर्बानीविरोधात मुस्लिम तरूणानं उघडला ‘मोर्चा’, 72 तासाचा केला ‘रोजा’