पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. आतापर्यंत १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुणे जिल्ह्यात आज, आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून, हा रुग्ण पिंपरी चिंचवड मधील आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ३३ वर पोहोचला असून यामध्ये पुणे जिल्ह्यात १६ रुग्ण आहे. पैकी पिंपरी चिंचवड शहरात रूग्णांची संख्या आता ९ झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीचा आज चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
#कोरोना आज १ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण झाले आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.@MahaDGIPR @mhaisekar1 @collectorpune1 @RajSarag pic.twitter.com/UXpjvE4EVP
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) March 15, 2020
त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १६ रुग्ण झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पिंपरी चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची १४ मार्चला चाचणी करण्यात आली, तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला ३, त्यानंतर ५ आणि आज १ रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने पिंपरी चिंचवडमधील रूग्णांची सर्वांधिक संख्या म्हणजे ९ झाली आहे.