Pune Porsche Car Accident Case | पोर्शे कार अपघात प्रकरणातील डॉ. तावरे अन् डॉ. हळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी

पुणे : Pune Porsche Car Accident Case | कल्याणी नगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Porsche Case) ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे (Dr Ajay Taware), मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले मंजुरी पत्र विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर (Judge U M Mudholkar) यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे (Adv Shishir Hire) यांनी गुरुवारी दाखल केले.

या अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवाल (Builder Vishal Agarwal) याच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी (Blood Sample Tampering Case) ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई अतुल घटकांबळे (Atul Ghatkamble) यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

डॉ. तावरे, डॉ. हळनोर, घटकांबळे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यास परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ प्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आता राज्य शासनाने आरोपींविरोधात फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे.