Pune Police Whatsapp Number | पुणे पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारी, महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना तसेच अभिप्राय देण्यासाठी जारी केला WhatsApp नंबर – सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police Whatsapp Number | दर्शना पवार हत्याकांड (Darshana Pawar Murder Case) असो की सदाशिव पेठेत तरुणीवर (Attack On Girl In Sadashiv Peth) झालेला हल्ला, या दोन्ही घटनांनंतर पुणे शहर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. एका बाजूला संपुर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) सुरू असून आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता पुणे शहरातील नागरिक थेट पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याकडे तक्रार करू शकणार आहेत. पुणे शहर पोलिसांकडून आता तक्रार करण्यासाठी नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 8975953100 या नंबर वर कोणीही कधी ही तक्रार करू शकतात. पोलीस आयुक्त यांनी सुरू केलाला व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकतात.
https://fb.watch/lHT64OlCGv/
त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार असून
तातडीच्या सेवेसाठी 112 डायल करा असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
याबाबत सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Web Title : Pune Police Whatsapp Number | Pune Police issues WhatsApp number for citizens’ complaints, suggestions and feedback on women’s safety – Jt CP Sandeep Karnik
- Pune Crime News | …अन् त्यांच्या चेहर्यावरील आनंद बस्स ! वानवडी पोलिसांकडून गहाळ झालेले 16 मोबाईल नागरिकांना सुपूर्द
- ACB Trap News | बीडीओंची सही पाहिजे तर ब्लॅक डॉगचे दोन खंबे द्या, दोन लाचखोर ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील एकाला महाड येथून अटक
Comments are closed.