पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नेहमी असे ट्विट केले जाते, ज्यावर युजर्सना कमेंट करण्याची इच्छा होतेच. त्यांचे ही ट्विट लोकांना खुष पण करतात आणि शिकवणही देतात. एका ट्विटर यूजर्सच्या ट्विटनंतर पुणे पोलिसांनी ही पोस्ट टाकली आहे. ट्विटर यूजरने ट्विट केले की, खान साहब विना हेल्मेट फॅन्सी नंबर प्लेट लावून गाडी चालवत आहेत, यावर योग्य ती कारवाई व्हावी.
https://twitter.com/Chandra75615686/status/1222019436665696256
KHANSAAB ko cool bhi banana hai
KHANSAAB ko hairstyle bhi dikhani hai
KHANSAAB ko hero waali bike bhi chalani hai
Par KHANSAAB ko traffic rules follow nahin karne
Aise kaise chalega KHANSAAB? #RoadSafety https://t.co/HaynTVwkuo
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) January 29, 2020
यूजरच्या या ट्विटनंतर पुणे पोलिसांनी असे ट्विट केले की, लोकांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत. पोलिसांनी लिहिले, खान साहबांना कूल सुद्धा बनायचे आहे, खान साहेबांना हेअर स्टाईल सुद्धा दाखवायची आहे, खान साहेबांना हिरो बाईकसुद्धा चालवायची आहे, पण खान साहेबांना ट्राफिक रूल्स पाळायचे नाहीत, असे कसे चालेल खान साहेब. यानंतर लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट करण्यास सुरूवात केली. एका यूजरने लिहिले माझे हसू तर थांबतच नाही, बरं कितीचे चलान कापले आहे सर, ट्विट करायला पाहिजे होते. बिचारा नवाब बनत होता, संपूर्ण नवाबी एक फोटो अपलोड केल्याने बाहेर आली.
Sir, chava bhai ko bhi sabak sikhana chahiye.
MH12CX 7859
Null stop signal. pic.twitter.com/EqnOmuBoE2— Majid Sayed (@majida2z) January 29, 2020
हे पाहिल्यानंतर दुसर्या युजरने दुचाकी चालकाचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, सर छावा भाईंनाही धडा शिकवा पुणे पोलिसांच्या या ट्विटला अद्यापर्यंत अनेक लाईक आणि 2 हजारपेक्षा जास्त कमेंट मिळाल्या आहेत. अनेक लोकांनी पुणे पालिसांना ट्विट करत त्यांचे कौतूक केले आहे. हे पाहून एका युजरने बाईक चालवणार्या एका युवकाचा आणखी एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे, सर छावा भाईला पण धडा शिकवा. या फोटोतील युवकाच्या बाईकच्या नंबर प्लेटवर छावा लिहिले आहे.
Visit : bahujannama.com