पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Police | मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) अण्णा कुंभार (Anna Kumbhar) याच्या एसी जुगार अड्ड्यावर (Gambling Den) सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch SS Cell) धाड टाकून ३६ जणांवर कारवाई केली होती. तेथून तब्बल ६ लाख रुपयांचा माल जप्त केला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरातील अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यास त्याला संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल,
असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिला होता.
समर्थ पोलीस ठाण्याचे (Samarth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior police inspector Vishnu Tamhane) यांची बदली गुन्हे शाखेतील पोलीस कल्याण पदी करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक रमेश साठे (Senior Police Inspector Ramesh Sathe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील (Pune Police Control Room) पोलीस निरीक्षक विश्वास गोळे (Police Inspector Vishwas Gole) यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
मानवी संसाधन विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे (ACP Pornima Taware)
यांची वानवडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पदी (Wanwadi Division ACP) नेमणूक करण्यात आली आहे.
वानवडीचे सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांची सहायक आयुक्त प्रशासनपदी नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.
Web Title :- Pune Police | Transfer of 3 Inspectors and 2 Assistant Commissioners of Police from Pune Police Commissionerate
हे देखील वाचा :