पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police | विमानतळ पोलीस ठाण्यातील (Pune Police) लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाला अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांनी निलंबित केले आहे.
मारुती बाबुराव वाघमारे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. तपासात तसेच जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विमानतळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील (API Rahul Patil) व खासगी व्यक्ती संतोष खांदवे (Santosh Khandve) यांना अटक केली होती. या प्रकरणात आणखी एक पोलीस शिपाई मारुती बाबुराव वाघमारे (Maruti Baburao Waghmare) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा (Pune Anti Corruption) अहवाल शहर पोलीस दलाला मिळाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी विमानतळ पोलीस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) मारुती वाघमारे याला निलंबित केले आहे.
Web Titel :- Pune Police | Pune policeman suspended.