पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police | पोलीस कोठडीत (Police Custody) असताना त्याला आतून बाहेर काढून पट्ट्याने बेदम मारहाण (Beating) केल्या प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी (Deputy Commissioner of Police Pune) एका पोलीस अंमलदाराला निलंबित (Pune Police) करण्यात आले आहे. पोलीस नाईक अनिल महादेव कोळी (Police Naik Anil Mahadev Koli) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी हा आदेश काढला आहे. (Policeman Suspended)
याबाबतची माहिती अशी, अनिल कोळी हे कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) पोलीस कोठडीवर ६ एप्रिलला रात्री ९ ते ७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत गार्ड ड्युटीला होते. रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी आरोपीला मारहाण केल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior PI Sardar Patil) यांनी कोळी याच्याकडे खुलासा मागितला. तेव्हा त्यांनी जाहेद शेख (Jahed Shaikh) याचा पाय दुखत असल्याने तो सोबत असलेल्या औषध गोळ्यांची मागणी करत होता. त्याला नक्की कोणत्या गोळ्या हव्या आहेत, हे सांगता येत नसल्याने त्यास बाहेर काढून गोळ्या देऊन परत लॉकअपमध्ये ठेवून दिले, आरोपीला कोणत्याही प्रकारे मारहाण केली असल्याचा खुलासा कोळी यांनी केला होता. (Pune Police)
कोंढवा पोलीस ठाण्यातील लॉकअपमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले असता प्रत्यक्षात आरोपीला मारहाण झाल्याचे आढळून आले. ६ एप्रिल रोजी रात्री २३ वाजून ४२ मिनिटांनी कोळी यांनी आरोपीस लॉकअपमधून पकडून जबरदस्तीने बाहेर काढले व त्यास हाताने मारहाण करुन गार्ड रुमच्या बाजुला घेऊन गेल्याचे दिसून येत आहे. व २३ वाजून ४४ मिनिटांनी पट्ट्यासारखी वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आले. त्यानंतर त्यास पुन्हा हाताने मारहाण करुन आरोपीला लॉकअपमध्ये ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर २३ वाजून ४६ मिनिटांनी पट्ट्यासारखी वस्तू परत ठेवण्यासाठी बाहेर गेल्याचे दिसत आहे.
त्यामुळे कोळी यांनी आरोपी जाहेद शेख याला अनाधिकाराने बाहेर काढून त्यास हाताने थोबाडीत मारली. पायाने आरोपीच्या पार्श्वभागावर लाथ मारली व तोंडावर बुक्कीमारल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या संपूर्ण घटनेचे लॉकअपमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रिकरण झालेले आहे. यावरुन कोळी यांनी आपल्या अधिकारात आरोपीस लॉकअप बाहेर काढून मारहाण केली असल्याचे दिसून आल्याने पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी निलंबित (Pune Policeman Suspended) केले आहे.
Web Title : – Pune Police | Pune Policeman suspended for beating accused in police custody of Kondhwa Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे दर
Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या झळा; IMD चा इशारा
Heart Health Tips | हृदयरुग्णांसाठी घातक ठरू शकते उष्णता, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा