Pune Police | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा ‘रूद्रावतार’ ! आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न; अनेकांचे धाबे दणाणले, ‘सेक्शन’ गरम
पुणे : बहुजननामा ऑनलाइन (नितीन पाटील) – Pune Police | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी शहरात कुठेही अवैध धंद्ये चालु देऊ नका. तसे आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल असं यापुर्वीच बैठकीत स्पष्ट केलं आहे.
शहरातील अवैध धंद्यांचं समुळ उच्चाटन करण्यासाठी आयुक्तांनी नामी युक्ती शोधली आहे. दरम्यान, मंगळवारी मुंढवा पोलिस ठाण्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केलं आहे. (Pune Police)
मुुंढवा पोलिस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत भिमनगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळताना 4 लोक आढळून आली. त्यांच्याकडून सुमारे 4000 रूपये जप्त करण्यात आले तर दुसरी कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडीगांव येथील भाजी मार्केटमधील रिकाम्या गाळ्यामध्ये करण्यात आली. तेथे दोन लोक जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तेथून सुमारे एक हजार रूपये जप्त केले.
शहरात कोठेही अवैध धंद्ये सुरू असलेले खपवुन घेतले जाणार नाही हे आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Sishve) यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते. पोलिस आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. (Pune Police)
शहरातील सेक्शन गरम
पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीत अवैध धंद्ये सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.
त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अवैध धंद्ये बोकाळल्याचे दिसून येत आहे. खुलेआमपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात शेकडोच्या संख्येने स्पा आणि मसाज पार्लरचं पेव फुटलं आहे.
दरम्यान, स्पा आणि मसाज पार्लरवाल्यांकडून संबंधितांचं व्यवस्थितरित्या ‘समाधान’ होत असल्यामुळं अलिकडील काळामध्ये स्पा आणि मसाज सेंटरवर एकही कारवाई झालेली नाही.
काही ठिकाणी तर सर्वच प्रकारचे अवैध धंद्ये सुरू असल्याची केवळ चर्चाच होते. मात्र, कोणी कारवाई करण्यास धजावत नाही. कारण ते अवैध धंद्ये 2 पोलिस ठाण्यांच्या बॉर्डरवर आहेत. दोन्ही पोलिस ठाण्यांच्या संबंधितांच्या कृपा आर्शिवादामुळं सर्वच चांगभलं सुरू आहे.
Web Title :- Pune Police | One More Senior Police Inspector Attached To Pune Polie City Control Room CP Amitabh Gupta
Comments are closed.