Pune Police News | गरवारे पुलाची दुरुस्ती नाहीच हे तर पोलिसांचे मॉक ड्रिल ! फर्ग्युसन रोड, एम जी रोडवर दहशतवादी हल्ल्याचा सराव, लोकांचा उडाला गोंधळ

Pune Police News | This is not the repair of Garware bridge, but a mock drill by the police! Terrorist attack practice on Ferguson Road, MG Road, people are confused

पुणे : Pune Police News | वाहतूक शाखेने शुक्रवारी दुपारी १ ते ४ दरम्यान गरवारे पुलाची दुरुस्ती करणार आहे़ तसेच एम जी रोडवर दुरुस्तीने रस्ता बंद राहणार असल्याची प्रेस नोट काढून लोकांनी या दरम्यान हे रोड वापरण्याचे टाळण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात अशी काही दुरुस्ती नव्हतीच. प्रत्यक्षात दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. पण, त्यामुळे लोकांचा मोठा गोंधळ उडाला. कर्वे रोडवरील वाहतूक कोंडीत अग्निशमन दलाची गाडी जवळपास १० मिनिटे अडकून पडली होती.

वाहतूक शाखेने गरवारे पुलाची दुरुस्ती असल्याचे तसेच कॅम्पातील एम जी रोडवर दुरुस्ती असल्याने या भागातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार, पोलिसांनी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास या परिसरातील वाहतूक बंद केली. त्यानंतर काही वेळाने दुपारी २ वाजता डेक्कन येथील मेट्रोच्या नवीन पादचारी पुलाजवळ पहिला ब्लास्ट झाला. त्याचा आवाज लांबवर गेला. गरवारे पुलाची दुरुस्तीचे कारण दिले असल्याने आजूबाजूच्या  लोकांना   पुलाचे काम सुरु आहे. पुल पाडला का अशा अनेक शंका आल्या. या ब्लास्ट पाठोपाठ तेथून काही जण बाजूच्या गल्लीत गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कमांडो तयारीनिशी त्यांच्या मागोमाग जाताना दिसले. त्यानंतर आणखी एक स्फोट झाला. त्यामुळे लोकांचा चांगलाच गोंधळ उडला. लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन स्फोट झाल्याचे कळविले. तेव्हा तेथील पोलीस अधिकार्‍यांनी मॉक ड्रिल सुरु असल्याचे सांगितले.

डेक्कन परिसरातील रोड बंद केल्याने कर्वे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यात नळस्टॉप येथून निघालेली अग्निशमक दलाची गाडी या वाहतूक कोंडीत अडकून पडली. त्यामुळे ती या मॉक ड्रिलच्या ठिकाणी जवळपास १० मिनिटांनी उशिरा पोहचली.

याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, डेक्कन व कॅम्पमधील एमजी रोडवर ब्लास्ट झाला. हा ब्लास्ट डमी होता. पोलिसांचे ते एक्सरसाईज ड्रिल आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन स्थिती ओढावल्यास तर काय करावयाचे या साठी केलेले हे एक मॉक ड्रिल आहे. या रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन त्याला लोकांना त्रास होऊ नये, म्हणून गरवारे पुल व एम जी रोडवर दुरुस्ती असल्याचे सांगण्यात आले होते, असे डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सागिंतले.