पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police News |पुणे पोलीस दलातील (Pune Police) महिला अधिकाऱ्यालाच तरूणाने लग्न करण्यासाठी मारहाण करत धमक्या देऊन त्रास देत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला अधिकाऱ्यांने सततच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून पुणे सायबर पोलिसांकडे (pune cyber crime cell police) तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सिद्धांत भगवानराव जावळे (वय 30, रा. माजलगाव, जि. बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत 28 वर्षीय महिला अधिकाऱ्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या पुणे शहर पोलीस दलात उपनिरीक्षक (Police Sub Inspector) आहेत. आरोपी हा त्यांचा मित्र आहे. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, सिद्धांत हा संशयातून शिवीगाळ व मारहाण करत होता. त्यामुळे तक्रारदार यांनी लग्नास स्पष्ट नकार दिला.
यानंतर मात्र आरोपी फिर्यादी यांच्या नातेवाईकांना सतत फोन करून लग्न लावून द्या अन्यथा आत्महत्या करेल व तुमच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता. तर दोघांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करून त्यांची बदनामी केली. तसेच मोबाईल हिसकावून घेत नोकरी सोड किंवा 5 वर्षांचा पगार देण्याची आणि आताच लग्न करण्याची धमकी देऊन अनेकवेळा पैसे उकळले आहेत.
याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास लोणीकंद पोलीस (Lonikand Police) करत आहेत.
web title: Pune Police News | Pune woman police officer beaten by youth for marriage; The photo threatens to go viral on social media.
Diesel Price in Pune Today | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसर्या दिवशी भाववाढ !