पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Combing Operation | महाशिवरात्री व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये कोंबिंग ऑपरेशन करुन शहरात सुरु असलेल्या जुगार (Gambling Den) व दारु विक्री अड्यांवर (Liquor Sales) कारवाई केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) हे कोंबिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) बुधवारी (दि.15) रात्री 9 ते गुरुवारी (दि.16) मध्यरात्री 2 या वेळेत केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सामाजिक सुरक्षा विभागाने खडकी बाझार येथे सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 16 जणांवर कारवाई केली. या कारवाईत 23 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींवर खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police Combing Operation)
तसेच बालेवाडी येथील साई चौकात बेकायदेशीर देशी दारु विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन 11 हजार 705 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 6 हजार 545 रुपयांची देशी दारु व 5 हजार 160 रुपये रोख असा मुद्देमाल आहे. आरोपीविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे कॅम्पातील सोलापुर बाजार येथे छापा टाकून बेकायदेशीर देशी दारु विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे,
अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदीप कोळगे,
अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.
Web Title : – Pune Police Combing Operation | Combing operation by Pune Police, action against gambling and liquor selling places
हे देखील वाचा :
Pune Traffic Updates News | शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Alia Bhatt | आलियाने शेअर केला बाळाचा फोटो?; अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव