पुणे : बहुजननामा ऑनलाइन – विनामास्क दुचाकी चालक तरुणांवर कारवाई केल्याच्या रागातून दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. सातारा रस्त्यावर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.
ऋषीकेश हनुमंत राउत (वय ३५, रा. भाग्यश्री गार्डन सोसायटी, धनकवडी ) आणि शौनिक अनिल पानसे (वय ३९, रा. पदमदर्शन सोसायटी, सहकानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शहरात विनामास्क नागरिकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगाण्यात आला आहे. त्यानुसार काल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गादिलवाड इतर सहका यांसोबत वाहनचालकांनी तपासणी करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या ऋषीकेश आणि शौनिकने मास्क घातले नव्हते. त्यामुळे गादिलवाड यांनी त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी दोन्ही कर्मचाNयांना धक्काबुक्की केली. त्याशिवाय महिला पोलीस उपनिरीक्षक छाया गादिलवाड यांचे मोबाईलमध्ये छायाचित्रण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सहकारनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.