पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMPML Accident | हडपसरच्या वानवडी भागातील रामटेकडी उड्डाणपुलावर पहाटे पीएमपीएमएलच्या बसचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बसचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुनील कोलते असे चालकाचे नाव असून, ते पीएमपीएमएलच्या रातराणी सेवेची बस (एमएच १२ आरएन ९०५३)
चालवत होते. रामटेकडी पुलावर एका खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसबरोबर (एनएल ०१ बी २३०६) त्यांची समोरून
धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातातील जखमी बसचालकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातासंदर्भात पोलिसांनी अजून गुन्हा नोंदविला नाही.
वाहतूक पोलीस घटनास्थळी वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत.
Web Title :- Pune PMPML Accident | pune pmpml bus accident on brt route on ramtekdi bridge pmpml driver seriously injured crime news
हे देखील वाचा :
Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे
Who Stop Bribery | ‘या’ लाचखोरांचे करायचे काय?