Pune PMC News | राज्यातील सत्ता बदलाचा असाही परिणाम ! केबल डक्टच्या कामाचे 12 कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेवर ‘राजकिय’ प्रेशर; अखेर महापालिकेने ‘देणे’ भागवून उत्पन्न मिळविण्यासाठी निविदा काढल्या

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune PMC News | राज्यातील सत्ताबदलानंतर एका केबल कंपनीच्या ‘भल्या’ साठी महापालिका प्रशासन पुढे सरसावले आहे. कोरोना काळात वेळ निभावून नेण्यासाठी महापालिकेच्या अटीनुसार अतिरिक्त डक्टचे काम करणार्या कंपनीने ‘राजकिय’ प्रेशर वापरून अतिरिक्त कामाचे तब्बल १२ कोटी रुपये पालिकेकडे मागितले आहेत. विशेष असे की दबावाखाली आलेल्या पालिका प्रशासनाने हे अतिरिक्त डक्ट ३० वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय घेतला असून त्यापोटी मिळणार्या उत्पन्नातून डक्टच्या कामाचे पैसे संबधित कंपनीला देउन वरील रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. (Pune PMC News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यासंदर्भातील माहिती अशी, की मोबाईल टॉवरच्या थकबाकीच्या मुद्यावर एक कंपनी महापालिकेविरोधात न्यायालयात गेली आहे. या कंपनीकडे मोठ्याप्रमाणावर थकबाकी असल्याने महापालिकेने या कंपनीला केबल टाकण्यासाठी खोदाईची परवानगी नाकारली आहे. दरम्यान, कोरोना काळामध्ये महापालिकेने एका कंपनीला शहरातील विविध रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी खोदाई करून डक्ट बांधण्याची परवानगी दिली होती. ही परवानगी देताना महापालिकेेने नियमाप्रमाणे खोदाईशुल्क भरून घेतले आहे. मात्र, त्याचवेळी डक्टचे काम करताना अतिरिक्त दोन पाईप (डक्ट) टाकावेत अशी अटही घातली होती. त्यानुसार या कंपनीने कामही केले. त्यांनी बांधलेल्या डक्टमधून ज्या केबल कंपनीला महापालिकेने परवानगी नाकारली होती त्याच कंपनीच्या केबल टाकण्यात आल्या आहेत. तर महापालिकेच्या मागणीनुसार केलेले अतिरिक्त दोन डक्ट अद्याप वापराविनाच आहेत. (Pune PMC News)
दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर डक्टचे काम करणार्या केबल कंपनीने महापालिकेकडे अतिरिक्त दोन डक्टच्या कामाचे तब्बल १२ कोटी मागितले.
यासाठी ‘राजकिय प्रेशर’ ही आणले. यामुळे महापालिकेने अतिरिक्त दोन डक्ट केबल कंपन्यांना ३० वर्षांच्या लीजवर वापरण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे.
यातून मिळणार्या उत्पन्नातून संबधित कंपनीला १२ कोटी रुपये देण्यात येणार असून उर्वरीत रक्कम महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा होणार आहे.
महापालिकेच्या पथ विभागाने डक्ट लीजवर देण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
यातून महापालिकेला ३० वर्षांसाठी किमान ७२ कोटी ८८ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
महापालिकेने ४८ कि. मी. लांबीचे दोन केबल डक्ट ३० वर्षांसाठी भाडेकराराने देण्यासाठी निविदा काढली आहे.
यामधून महापालिकेला ७२ कोटी ८८ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
Web Title :- Pune PMC News | Such a result of the change of power in the state Political pressure on Municipal Corporation to get Rs 12 crore for cable duct work Finally the Municipal Corporation floated tenders to earn income by paying the dues
हे देखील वाचा :
Comments are closed.