पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune PMC News | महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या उपक्रमांसाठी विविध संस्थांच्या ताब्यात असलेल्या वास्तुंचे करारनामे नियमीत करण्याच्या प्रस्तावाला उपसूचना देउन दोन वास्तू वगळणार्या सर्वसाधारण सभेला (PMC General Body Meeting) राज्य शासनाने (Maharashtra State Government) दणका दिला आहे.
सर्वसाधारण सभेने ऑक्टोबर २०१० मध्ये उपसूचना देउन बदललेला प्रस्ताव विखंडीत करून प्रशासनाच्या प्रस्तावालाच मान्यता दिली आहे. (Pune PMC News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वर्षानुवर्षे नगरसेवकांशी संबधित संस्थांच्या ताब्यात असलेली समाज मंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका, ग्रंथालयांचे ऑडीट करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले.
अनेक संस्थांनी संयुक्त प्रकल्पाअंतर्गत यासाठीच्या वास्तु स्वत:च्या ताब्यात ठेवल्याचे निदर्शनास आले.
महापालिकेच्या मालकिच्या १३१ वास्तु वरिल उपक्रमांसाठी समाज विकास विभागाच्या ताब्यात आहेत.
या वास्तुंचे करार काही अटीशर्तींसह नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. (Pune PMC News)
दरम्यान या प्रस्तावापुर्वी शहराच्या पूर्व भागातील कासेवाडी येथील वैशाली सायकल मार्ट जवळील समाज मंदिर व कै. जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममधील लहुजी वस्ताद फिटनेस क्लबवरून स्थानीक भाजप आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये टोकाचे वाद झाले होते.
या दोन्ही वास्तू महापालिकेने काही काळासाठी सीलही केल्या होत्या.
यानंतरच प्रशासनाने सर्वच वास्तुंचे करारनामे काही अटीशर्तींसह नियमित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता.
स्थायी समितीमध्ये याला उपसूचना देउन बहुमताच्या जोरावर मंजुरीही देण्यात आली होती.
सर्वसाधारण सभेतही सत्ताधारी आणि विरोधकांकडून या दोन्ही नगरसेवकांमधील वाद मिटविण्याची सामंजस्याची भूमिका मांडताना कासेवाडीतील समाज मंदिर आणि व्यायामशाळा या दोन्ही वास्तु उपसूचनेसह प्रस्ताव एकमताने मंजूर केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सर्वसाधारण सभेने दिलेल्या उपसूचनेमुळे या ठरावांची अंमलबजावणी करणे योग्य नसल्याचा अभिप्राय देत महापालिका आयुक्तांनी
हे प्रस्ताव विखंडीत करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता.
राज्य शासनाने या अभिप्रायावर सकारात्मक भुमिका घेत सर्वसाधारण सभेने अंतिम मंजुरी दिलेला प्रस्ताव महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ४५१ (१) नुसार निलंबीत करण्याचे आदेश नुकतेच ९ जून रोजी दिले आहेत.
यामुळे या वास्तुंसह १३१ वास्तुंचे करार नियमित करण्याबद्दल प्रशासनाच्या हालचालींना गती मिळणार असून हा सर्वच राजकिय पक्षांच्या नगरसेवकांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Web Title :- Pune PMC News | Maharashtra state government knocked on the general meeting of the Pune Municipal Corporation for the that decision of Samaj Mandir and Gymnasium
हे देखील वाचा :
Maharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार
Pune Crime | उत्तमनगर परिसरात टोळक्याकडून कोयते नाचवत वाहनांवर दगडफेक