Pune PMC Election 2022 | ओबीसी आरक्षणामुळे पुणे महापालिका निवडणुकीत होणार मोठे फेरबदल ! ओबीसी व महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार; त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच निवडणूक सप्टेंबरमध्ये?

 Pune PMC Property Tax | Kasba by-election 'Impact'! While the Mahavikas Aghadi united to restore the 40 percent tax exemption, the BJP also submitted a statement to the Chief Minister
July 20, 2022

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune PMC Election 2022 | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला २७ टक्के जागा आरक्षित ठेवण्यासोबतच (OBC Political Reservation In Maharashtra) निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने सप्टेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्याच्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच (PMC Draft Ward Prabhag Structure) या निवडणुका होणार असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले असून 173 सदस्यीय पुणे महापालिकेमध्ये 47 जागा या ओबीसींसाठी आरक्षित राहातील. त्याचवेळी ओबीसी आरक्षणामुळे एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गासाठीच्या आरक्षित (SC And ST Reservation) जागांव्यतिरिक्त महिलांसाठीच्या व ओबीसी प्रवर्गाच्या जागांसाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार असल्याचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले. (Pune PMC Election 2022)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुक घेण्याचे आदेश दिले आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार आहे. पुणे महापालिकेत 58 प्रभाग असुन, यामध्ये १७३ सदस्य असतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 27 टक्के इतके आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या 173 जागांच्या 27 टक्के म्हणजे 47 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केल्या जातील. यामध्ये 24 जागा या ओबीसी महीलांसाठी असतील, तर 23 जागा या ओबीसी खुल्या गटासाठी. ओबीसी आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार एससी आणि एसटी या वर्गासाठी आरक्षित जागांचे आरक्षण काढले गेले. 173पैकी 25 जागा या दोन वर्गातील पुरुष आणि महीलांसाठी आरक्षित केले गेले. (Pune PMC Election 2022)

 

महापालिकेच्या 58 प्रभागांमधील 173 सदस्यांमध्ये 87 जागा या महिलांसाठी आरक्षित असून 86 जागा या खुल्या गटासाठी आहेत. यापैकी एक प्रभाग द्विसदस्यीय आहे. या प्रभागामधील एक जागा एस.टी. प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने तेथील दुसरी जागा ही खुल्या गटासाठीच राहाणार आहे. तर 23 प्रभागांमधील एक जागा ही एस.टी. प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत 34 प्रभागांमधील पहिली अर्थात ‘अ’ जागा ही ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहाणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उर्वरीत 13 जागांसाठी 23 प्रभागांमध्ये चिठ्ठ्या टाकून ‘ब’ ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित केली जाणार आहे. हे करत असताना महिला आरक्षणामध्येही बदल होणार असल्याने महिला आरक्षणाची सोडतही पुन्हा नव्याने काढावी लागेल, अशी माहिती उपायुक्त यशवंत माने (Yashwant Mane PMC) यांनी दिली.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुक विभागाने प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी पुर्ण काम केले आहे. जुन महीन्यात प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली होती. या याद्यांवर सुमारे 5 हजार 546 हजार हरकती, सुचना आल्या होत्या. यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन, संबंधित प्रभागातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन यादीत दुरुस्ती केली गेल्याचा दावा निवडणुक अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले. हरकती आणि सुचनांचा विचार करता, त्या सुमारे पाच लाख मतदारांशी निगडीत होत्या. त्यापैकी सुमारे सव्वा तीन लाख मतदारांशी संबंधित यादीत बदल केले गेले. या सुधारणा प्रभाग निहाय केल्या असुन, महापालिकेच्या हद्दीबाहेरील भागातील सुमारे साडे पाच हजार मतदारांचा समावेश महापालिकेच्या प्रभागांच्या यादीत झाला होता. त्यांना अंतिम यादीत वगळण्यात आले आहे. तसेच अनेक मतदारांचे पुर्ण पत्ते नव्हते, त्याबाबत भाग यादीच्या पत्त्याच्या आधारे बदल केला गेल्याचे माने यांनी नमूद केले.

 

पुढील निवडणूक कार्यक्रम असा असेल

अंतिम मतदारयादी प्रसिद्धी.

ओबीसी, महिला आरक्षण सोडत.

निवडणूक कार्यक्रमाची घोषणा.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | Due to OBC reservation, there will be a big change in the Pune municipal election! Lottery for OBC and women reservation to be drawn again; Election in three-member ward system in September?

 

हे देखील वाचा :

Prithviraj Chavan | ‘घाईगडबडीमध्ये राजीनामा देवून उध्दव ठाकरेंनी फार मोठी चुक केली’ – पृथ्वीराज चव्हाण

RBI Digital Currency | देशात लवकरच सुरू होणार डिजिटल करन्सी, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रासाठी टप्प्याटप्प्याने होत आहे काम

Pune News | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांना करिअर मार्गदर्शन