पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पतीचा खून (Murder) करुन पतीने आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव रचला. पतीचा (Husband) खून करून आत्महत्या केल्याचे भासवण्यात पत्नीला (wife) सुरुवातील यश आले. पोलिसांना (Pune Police) देखील ‘क्राईम सिन’ पाहून खात्री पटली की ही आत्महत्याच आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयात केलेल्या शवविच्छेदन अहवालातून देखील आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नातेवाईकांना यावर विश्वास बसला नाही. तो आत्महत्या करणारा नाही, हे नातेवाईकांनी ठामपणे पोलिसांना सांगितले. त्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. यामध्ये आत्महत्या नसून खून (Pune Pimpri Crime) असल्याचे उघड झाले.
पस्तीस ते चाळीस वयोगटातील पती मराठवाड्यातून दहा ते बारा दिवसांपूर्वी कामासाठी पुण्यात आला होता. सोबत त्याची पत्नीही होती. वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत हे दोघे राहत होते. पती रोज संध्याकाळी दारु पिऊन येत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच वादातून पत्नीने पतीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pune Pimpri Crime)
या प्रकरणी पहिल्यांदा केलेल्या शवविच्छेदन अहवालात (Postmortem Report) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नातेवाईकांच्या मागणीनुसार पुन्हा ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दगडासारखी कठीण वस्तू डोक्यात मारली असावी अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच जोरात गळा आवळण्यात आला आहे. या दोन्ही कारणांनी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. याच आधारावर पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली. चौकशीत पत्नीनेच पतीचा खून केल्याचे उघड झाले.
Web Title :- Pune Pimpri Crime | wife murder husband wakad police station sasoon hospital pune pimpri crime news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Tata Motors Stock | रू. 530 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, राकेश झुनझुनवाला यांचा आहे आवडता, एक्सपर्ट बुलिश
- MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; म्हणाल्या – ‘आणखी एक तारीख पाहू’
- PM Narendra Modi | देहूतील कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, PM मोदीही म्हणाले – ‘दादांना बोलू द्या’; जाणून घ्या नेमकं काय घडलं ?
- PM Narendra Modi Visit Dehu | दौरा PM मोदींचा अन् चर्चा अजित पवारांची, विमानतळावरील ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- Supriya Sule | PM मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…