Pune Pimpri Crime | बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ही कारवाई (Pune Pimpri Crime) बावधन येथील भूगावरोडवर असलेल्या गोल्डन क्राऊन लॉजवर गुरुवारी (दि.1) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केली.
प्रकाश मनबहादूर क्षैंत्री (वय 30, रा. बावधन, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महेश नारायण वायबसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी प्रकाश याच्यावर आयपीसी 370 (3), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बावधन येथील भूगावरोडवर असलेल्या गोल्डन क्राऊन लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी लॉजवर छापा टकून आरोपीला अटक केली.
आरोपी प्रकाश महिलांना जास्तीचे पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होता.
यातून मिळणाऱ्या पैशांतून तो आपली उपजीविका भागवत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | prostitute racket busted at Golden Crown Lodge in Bawdhan
हे देखील वाचा :
IPL 2023 | ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून निवृत्ती; सीएसकेने त्याच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली गंभीर दुखापत
Comments are closed.