Pune Pimpri Crime | व्हॉट्सअॅपपवरील लिंक ओपन करणं तरुणाला पडले महागात, सायबर चोरट्यांनी घातला अडीच लाखांचा गंडा
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत असतात. चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक ओपन करणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर गुन्हेगारांनी (Pune Pimpri Crime) लिंकद्वारे तरुणाला तब्बल 2 लाख 53 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 10 जून 2022 ते 12 जून 2022 या कालावधीत घडला आहे.
याबाबत स्वप्नील विलास मुसणे (वय 26, रा. चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे) याने शुक्रवारी (दि.2) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी 9007185081 मोबाइल धारक व त्या लिंकधारकावर आयपीसी 417, 420, आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील यांच्या मोबाइल नंबरच्या व्हॉट्सअॅपवर आरोपींनी एक लिंक पाठवली.
ती लिंक ओपन केली असता फिर्य़ादीच्या नावाचे Musne12 हे अकाउंट तयार झाले.
स्वप्नील याला एका लिंकवरून यावरून रोज टास्क मिळत होते. हे टास्क पूर्ण करून भरपूर नफा मिळवा असे आमिष आरोपींनी दाखवले.
या टास्कचे निमित्त करून आरोपींनी दोन दिवसांत फिर्य़ादी यांच्याकडून पेटीएमद्वारे दोन लाख 53 हजार रुपये घेतले.
परंतु फायदा मिळाला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर स्वप्नील यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Opening the link on WhatsApp was expensive for the young man, the cyber thieves cheated him of two and a half lakhs
हे देखील वाचा :
Shinde Fadnavis Govt | उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीस सरकारला दणका; ‘या’ निर्णयाला दिली स्थगिती
Mumbai Crime | खारमध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसत केला महिलेचा विनयभंग
PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी
Pandharpur News | खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श व कर्तृत्ववान मातांचा सन्मान



Comments are closed.