Pune Pimpri Crime News | अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड परिसरात विनापरवाना अनधिकृतरित्या फटाके दुकान (Unauthorized Fireworks Shop) चालविणाऱ्या विक्रेत्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Police) कारवाई केली आहे. रावेत येथील तीन फटके विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.13) करण्यात आली. (Pune Pimpri Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रावेत परिसरात तीन विक्रेत्यांनी अनधिकृत फटाके स्टॉल लावले होते. त्यासाठी विक्रेत्यांनी महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून परवाना घेतला नसल्याचे समोर आले आहे. अनधिकृत फटाका स्टॉलमुळे या भागातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. स्टॉल मालकांनी संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी पुरेसे साहित्य जवळ ठेवले नाही तसेच शासनाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे पालन न करता फटाक्यांची विक्री केली. अनधिकृत फटाका स्टॉल लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
रावेत येथील मुकाई चौक ते चंद्रभागा कॉर्नर दरम्यान अनधिकृतपणे मोरया फटाका स्टॉल लावणाऱ्या
आदित्य सुनिल तरस (वय-21 रा. विकासनगर, किवळे, रावेत),
धर्मराज फटका स्टॉलचे विकास जनार्दन घोडके (वय-24 रा. भोडवेवस्ती, रावेत), रोहित यशवंत घाग (वय-25 रा. किवळे)
यांच्यावर आयपीसी 188, 286, 336 सह स्फोटक पदार्थ (द्रव्य) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल आहे.
याबाबत पोलीस शिपाई संजय गणपती आंधळे यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.