पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Pimpri Crime) एका सराईत गुन्हेगाराची विरुद्ध टोळीने भरचौकात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pune Pimpri Crime) सहा जणांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विशाल गायकवाड असे खून करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. विशालच्या नावे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याचा गुन्हेगारीचा इतिहास आहे. विशालवर खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल होते. पूर्ववैमन्यस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी रात्री 13 जणांच्या टोळक्याने अचानक येऊन गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून विशाल गायकवाड याचा खून केला. यावेळी गंभीर जखमी होऊन विशालचा जागीच मृत्यू झाला. विशाल गायकवाड या गुंडाचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आहे. याच वादातून हा प्रकार घडला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या तीन पुंगळ्या मिळाल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, विशालचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता.
दादा कांबळे याची या व्यवसायात भागीदारी होती. यावरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले होते.
त्या वादातून हत्या झाली आहे. हत्येच्या वेळी विशाल गायकवाड परशुराम चौकात खुर्चीवर बसला होता.
तेव्हा 13 जणांच्या टोळक्याने अचानक येऊन पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या व कोयत्याने वार करून विशालची निर्घृण हत्या केली.
Web Title :- Pune Pimpri Crime | firing pistol murder in pimpri chinchwad crime pimpri police news
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून पिंपरी कॅम्पमध्ये कपडे विक्री
Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे
Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियल परस्पर विकून कंपनीची 48 लाखांची फसवणूक; वाघोली येथील प्रकार
COEP Course Closed | सीओईपीचा रेल्वे-मेट्रो अभ्यासक्रम बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात?