पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | दारुच्या नशेत स्टंटबाजी (Drunk Stunt) करणे अनेकदा जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune Pimpri Crime) घडली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Video Viral) होत आहे. ही घटना निगडी ओटास्कीम (Nigdi Otascheme) येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल सुदाम कांबळे (वय – 50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल हे मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले.
दारु पिण्याच्या सवयीमुळे कांबळे या व्यक्तीने आपल्या पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा (Pune Pimpri Crime) प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा प्रकार निगडी येथील सेक्टर 22 येथील प्रेरणा सोसायटीच्या 11 नंबर बिल्डिंगमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ इमारतीखाली उभे असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
व्हिडिओमध्ये दिसत आहे, की या व्यक्तीने घराच्या खिडकीमधून एक साडी बाहेर टाकली आहे.
या साडीच्या मदतीने तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान बघ्यांची गर्दी इमारती खाली जमली.
लोक त्याला असं न करण्याचे सांगत आहेत. परंतु हा व्यक्ती कोणाचंही ऐकायला तयार नाही.
इतक्यात अचानक त्याचा हात निसटला आणि तो चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला.
यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) नोंद करण्यात आली आहे.
Web Title : – Pune Pimpri Crime | drunk man dies after falling from building in pimpri chinchwad of pune video viral
हे देखील वाचा :
Celery Decoction | सर्दी-खोकल्यापासून सुटका करण्यास उपयोगी ओव्याचा काढा, बूस्ट होईल इम्यूनिटी
Home Stay | ‘होम स्टे” बनला गावातील तरूणांचा रोजगाराचा मार्ग; जाणून घ्या ‘होम स्टे’ म्हणजे काय?