पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | लग्नासाठी वधू-वर सूचक मंडळात नावनोंदणी केलेल्या महिलेला संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नापूर्वी पूजा-अर्चा करायच्या असल्याचे सांगून 12 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 1 डिसेंबर 2022 या कालावधीत चिखली येथे घडला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) उत्तराखंड येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 36 वर्षांच्या महिलेने गुरुवारी (दि.1) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वत:च्या लग्नासाठी माळी वधू-वर सूचक मंडळामध्ये नावनोंदणी केली आहे.
आरोपीने फिर्यादी यांचा मोबाइल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून लग्न जमवण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी पूजा-अर्चा करावी लागणार असल्याचे सांगितले.
त्यासाठी आरोपीने महिलेकडून वेळोवेळी 12 लाख 17 हजार 120 रुपये घेतले.
पैसे दिल्यानंतर आरोपीने लग्न न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदळे करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Cheating Of 12 Lacs With Woman Incident In Chikhali Are
हे देखील वाचा :
Latur Crime News | अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; लातूर पोलिसांची मोठी कामगिरी
Pune Pimpri Crime | प्रेमात खर्चलेल्या पैशांची मागणी करत तरुणीवर बलात्कार; भोसरी परिसरातील घटना